मुंबई : कालपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी रास गरब्याचे आयोजन केले जात आहे. पहिल्या दिवशी तरुणांनी दांडियावर ठेका धरला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनादेखील या तरुण-तरुणींसोबत गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शहरातील गरबा उत्सवाला हजेरी लावली. यावेळी नवनीत राणा यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली.
यावेळी नवनीत राणा यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. नवनीत राणा यांनी तरुणांसोबत गरबा खेळण्यास सुरुवात केली. यावेळी गुजराती आणि हिंदी गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.