जळगाव : अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नावाची यादी नुकतीच जाहीर केली. यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या अनेक जिल्ह्यांच्या जबाबदारीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. विशेष करून अजितदादांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. आता त्यांच्या टीकेला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजितदादांना काय बोलावं हे कळत नाही. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या परिवाराबद्दल जनतेला सगळं माहीत आहे. तुम्हाला एवढा संभ्रम का पडतो? आपली कार्यक्षमता तसेच आपण काय काय पराक्रम केले आहेत, ते जनतेला सुद्धा माहिती आहे.अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनीकेली.
हे पण वाचा
महाराष्ट्रातील या खात्यात 300 जागांसाठी भरती, अर्जासाठी इतके दिवस बाकी, लवकर अर्ज करा
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर ; राज्यात आणखी २० हजार पदांची भरती
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातय महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. तुमच्या मनात काही काळेबेरे आहे. आपल्या परिवारात लोकांना भेटताना आपल्या परिवारातील लोक कुठे अडकले आहेत हे आपल्याला चांगलं माहीत आहे. त्यामुळे तुम्ही कॅमेरे घेऊन गेले किंवा नाही गेले लोकांना मोदी आणि आपल्या परिवारातील फरक जनतेला माहीत आहे, असा जोरदार टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.