जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. आता त्यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे. आम्ही टपरीवाले होतो. मात्र गाडीमध्ये रॉकेल टाकत नव्हतो. तुम्ही श्रीमंत आता तर श्रीमंता सारखं राहा ना, अमित शहा यांना कशाला भेटायला जातात, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्याच्या मैदानावरूनही त्यांचे मत व्यक्त केले आहे. शिवतीर्थ मैदान मिळाले म्हणजे कोणती मोठी लढाई जिंकली? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे. कोणाकडे जास्त लोक येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचेही पाटील म्हणाले. शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे, याचा आनंदच आहे. मात्र या ठिकाणी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार मांडू नका, एवढीच अपेक्षा असल्याचा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
हे पण वाचा :
सरकारच्या ‘या’ योजनेमुळे लाखांहून अधिक लोकांना मिळाला रोजगार, जाणून घ्या अर्जाची पद्धत?
या स्मॉल फायनान्स बँकेने FD चे दर 1% ने वाढवले! आता ग्राहकांना ‘इतके’ टक्के परतावा
13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 7 महिन्यांची गरोदर, बहिणीच्या दिराने केला अनेकवेळा अत्याचार
जळगावात काँग्रेसला बसणार धक्का? हा आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा
दरम्यान, यावेळी गुलाबराव पाटील यांनी पुण्यात देण्यात आलेल्या ‘पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवरूनही इशारा दिला आहे. पुण्यात ज्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ची घोषणाबाजी केली त्यांच्यावर थेट देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे. त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. शेवटी देश महत्वाचा आहे. तो कोणत्याही जाती, धर्माचा असेल. मात्र सरकार म्हणून देशाच नागरिक म्हणून अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे, अशा कडक शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.