NIA राष्ट्रीय तपास एजन्सीने पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात पीएफआयच्या च्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयसमोर आंदोलन केले मात्र यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घोषणाबाजीने परिसर दणानून सोडल्यानं एकच खळबळ उडाली. याचा व्हिडिओ देखील राम विसपुते यांनी ट्विट केला आहे तर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी मात्र या घटनेवर स्पष्टीकरण दिलेलं नाही तसेच या व्हिडिओबाबत आणि त्यात देण्यात आलेल्या घोषणाबाजीबाबत सुद्धा अद्याप कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. पण याप्रकरणी पीएफआयचा कार्यकर्ता रियाज सय्यद याच्यासह ६० ते ७० इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अनधिकृतरित्या निषेध आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.
पुण्यात PFI च्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत.
देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये. @CPPuneCity कठोर कारवाई करावी.@DGPMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/2Bhvgt7HeG— Ram Satpute (@RamVSatpute) September 24, 2022
आमदार राम सातपुते यांनी ट्विट करून काय म्हणाले वाचा
या घटनेसंदर्भात भाजपच्या नेत्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. आमदार राम सातपुते यांनी पुणे पोलीस, राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं की, “पुण्यात PFI च्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत. देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये”
Maharashtra | Case registered against a man named Riyaz Sayyad along with 60-70 other PFI workers in Pune city for unlawful gathering to protest in front of District Collector office yesterday over NIA raids on PFI: Pune Police
— ANI (@ANI) September 24, 2022