जळगाव : शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मागच्या दोन महिन्यांपासून बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी जळगावातील मेळाव्यात शिंदे सरकार व त्यांच्या आमदारांवर जोरदार टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेवर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील म्हणाले कि, अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. मात्र त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले. पण अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहे, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती.
हे पण वाचा :
ना कार, नाही आलिशान घर.. पंतप्रधान मोदींकडे एकूण किती संपत्ती आहे? जाणून घ्या
‘या’ राशींसाठी पुढील 4 महिने उत्तम, पैशांचा पडेल पाऊस..; यात तुमची तर नाही राशी?
‘माझ्या विरोधात दोन गुलाबराव फिरताहेत..
कोणती जागा कोणाला दिली जाणार नाही हे, त्यांना माहित नाहीये, आता जळगाव ग्रामीण मतदारसंघात पाच वेळा शिवसेनेचा उमदेवार निवडून आला, ही जागा राष्ट्रवादीला जाणार आहे का? हा सवालही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. पाचही ठिकाणी शिवसेनेचे आमदार , या पाचही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले आहे, मग याठिकाणी राष्ट्रवादीचे कि शिवसेनेचे उमेदवार हे त्यांच्या पायदनात पाय नाहीये, असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला.