जळगाव : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच आता अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आलीय. १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवीत वेळोवेळी संबध प्रस्थापित करत तिला ७ महिन्याची गरोदर केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात एका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे घटना?
एका १७ वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवीत वेळोवेळी संबध प्रस्थापित करत तिला सात महिन्याची गर्भवती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पीडित युवतीच्या वडिलांनी दि १२ रोजी नशिराबाद पोलीस स्थानकात धाव घेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी विशाल तानाजी पवार याच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.
हे पण वाचा..
वडिलांच्या संपत्तीवर मुला-मुलींचा हक्क किती? काय म्हणतो कायदा? हे लगेचच जाणून घ्या
पेट्रोल-डिझेल, LPG सिलिंडरच्या किमतीतून मिळणार दिलासा ; जाणून घ्या सरकारचे संपूर्ण प्लॅनिंग
खळबळजनक ! अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग चार वर्षे तरुणीवर केला बलात्कार
प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत दरमहा मिळेल ‘इतके’ पेन्शन