जळगाव – जळगांव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक आज बुधवार १२ जून रोजीअपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीस महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य तथा जळगांव जिल्हा ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विकास महाजन विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित अशासकीय सदस्य साहित्यिक अ.फ.भालेराव(मुक्ताईनगर),यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, प्रा.सुरेश रोकडे (भडगाव), रवी अण्णा महाजन (एरंडोल), दादा वाणी(यावल),डॉ.परीक्षित बाविस्कर (जळगांव) यांच्यासह अन्न प्रशासन सहा.आयुक्त योगेश बेंडकुळे,औषध प्रशासन सहा.आयुक्त जाधव, वैध मापन शास्त्र सहा.नियंत्रक रा.भ.बांगर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके,सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी कुलकर्णी साहेब,यांच्यासह अनेक शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते. बैठकीत ग्राहक हिताचे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा केली.
ग्राहक संरक्षण परिषदे मार्फत खूपच प्रश्न मार्गी लागलेत म्हणून समाधानही व्यक्त करण्यात आले.
यावेळी अ.भा.ग्राहक पंचायतीतर्फे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना पुस्तक भेट देण्यात आले.
ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीलजी सूर्यवंशी यांनी आभार मानले.