एक जवान देश सेवा करतो म्हणून आपण सर्वजण निर्धास्तपणे राहू शकतो जवान त्यांचे घरदार सोडून थंडी उन वारा पाऊस न पाहता देशसेवा बजावत असतो असे असताना देखील देश सेवा करून सेवानिवृत्त झालेला जवानांना समाजाने व प्रशासनाने सन्मानाची वागणूक दिलीच पाहिजे मात्र चोपडा पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांनी सेवानिवृत्त श्री पंकज पाटील यांना शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली छोटेसे कारण असताना एका सेवानिवृत्त जवानास गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन अमानुषपणे मारहाण करणाऱ्या चोपडा पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास रयत सेनेच्या वतीने महाराष्ट्रभरातील सेवानिवृत्त जवानांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल व याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी चोपडा पोलीस निरीक्षक श्री अवतार सिंग चव्हाण हेच जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रति केंद्रीय गृहमंत्री,भारतसरकार,
केंद्रीय स्वरक्षणमंत्री,भारतसरकार गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री म. रा. मुंबई, जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव, वेल्फेअर अधिकारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव,
खासदार जळगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश संघटक संता पैलवान, प्रदेश समन्वयक पी एन पाटील ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड उपाध्यक्ष गोकुळ पाटील संघटक गोविंद वाघ जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे,स्वप्निल गायकवाड तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार पवार, भरत नवले ,सतीश पवार ,संदीप पाटील ,किरण आढाव, दीपक देशमुख ,रवींद्र जाधव, रमेश पवार, भूषण पाटील, प्रवीण देसले ,किरण पाटील, जयेश शिंदे ,विजय देवरे, चंद्रकांत पाटील ,विकास पवार ,भूषण चव्हाण, गणेश गोसावी, बाळासाहेब वाळके, दीपक नागणे ,राकेश निकम, कृष्णा नगरचे अध्यक्ष सरपंच मनोज चव्हाण ,योगेश चव्हाण, निलेश चव्हाण, भानुदास चव्हाण ,अल्केश चव्हाण, किरण चव्हाण अदि रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते