तुम्हीही तुमच्या मुलाचे बँक खाते उघडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.कारण आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा दिली जात आहे. कोणत्याही वयाच्या मुलांचे खाते पालकांना किंवा गार्डियनला उघडता येईल. हे लक्षात घ्या कि, SBI मध्ये आपल्याला प्रकारची खाती उघडता येतील. यातील एका खात्याचे नाव SBI Pehla Kadam आणि दुसऱ्या खात्याचे नाव SBI Pehli Udaan असे आहे.
एका मीडिया रिपोर्ट्स रिपोर्टनुसार, Pehla Kadam आणि Pehli Udaan नावाने ऑनलाइन बचत खाते उघडता येईल. या दोन्ही बँक खात्यांमध्ये नेट बँकिंगसह जवळपास सर्वच बँकिंगच्या सुविधा दिल्या जातात. तसेच यामध्ये पैसे काढण्याची मर्यादा असल्याने पैशांच्या उधळपट्टीची भीती देखील नाही. त्याच बरोबर या खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे बंधन देखील नाही.
Pehla Kadam बँक अकाउंट
कोणत्याही वयोगटातील मुलांच्या नावाने हे खाते उघडता येईल. यामध्ये अल्पवयीन मुलांसह पालकांना किंवा गार्डियनला जॉईंट अकाउंट उघडता येईल. हे खाते फक्त मुलाच्या नावाने उघडता येणार नाही. तसेच हे खाते पालकांना किंवा मुलांना स्वतः वापरता येईल. यामध्ये खातेदाराला एटीएम डेबिट कार्डची सुविधा देखील दिली जाते. या कार्डद्वारे 5,000 रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. यामध्ये मोबाईल बँकिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.
यामध्ये मोबाईल बँकिंग वापरून बिल पेमेंट देखील करता येईल मात्र ट्रान्सझॅक्शनसाठी काही लिमिट असेल. तसेच मोबाईल बँकिंगद्वारे फक्त 2,000 रुपये खर्च करता येतील. इंटरनेट बँकिंग सुविधेमध्ये ट्रान्सझॅक्शनसाठी डेली 5,000 रुपयांचे लिमिट असेल. यामध्ये खास डिझाईन केलेले 10 पानांचे चेकबुकही दिले जाते.
Pehli Udaan बँक अकाउंट
10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना हे खाते उघडता येईल आणि त्यांना यामध्ये स्वतःची सही देखील करता येईल. हे खाते फक्त अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडले असल्याने तो एकटाच वापरू शकतो. यामध्ये एटीएम डेबिट कार्डची सुविधा देखील मिळेल. तसेच डेली 5000 रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. Pehli Udaan च्या खातेदाराला मोबाईल बँकिंग वापरून डेली 2000 रुपये खर्च करता येतील. जर अल्पवयीन व्यक्ती सही योग्यपणे करू शकत असेल तर त्याला खास डिझाइन केलेले चेकबुकही दिले जाते.