लातूर : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसतेय. अशातच लातूर जिल्ह्यात महिलेवर झालेल्या अत्याचाराने मोठी खळबळ उडाली आहे. अंध आणि मूकबधिर असलेल्या एका महिलेला ऊसाच्या फडात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. पिडीत महिलेच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपीने हे कृत्य केल्याची बाबत समोर आली असून याप्रकरणी गातेगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना
गातेगाव पोलिसांच्या हद्दीत असलेल्या गातेगाव या गावात दोन अंध-मूकबधिर महिला आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहतात. पीडिता आणि आरोपी हे शेजारी शेजारी आहेत. पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पीडिता आणि तिच्या बहिणीसोबत घरी येऊन छेडछाड करायचा.
हे पण वाचा :
खिशात पैसे थांबत नसतील तर करा हा खात्रीशीर उपाय, पैशांनी भरलेले राहील पर्स
झाडावर चढताना अजगराचा व्हिडिओ पाहून तुमचेही होश उडतील!
सनी लियोनीचा एथनिक लुक पाहिलात का? हे फोटो पाहून व्हाल घायाळ!
बोंबला ! महिला ज्या व्यक्तीला 6 वर्षांपासून डेट करत होती तो निघाला भाऊ, डीएनए चाचणीतून सत्य समोर
पीडिता ही अंध आणि कर्णबधिर असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने पिडीतेला घराजवळच्या शेतात ओढत नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. पिडीतेचा आरडा-ओरडा ऐकून काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता आरोपीने पळ काढला.
पिडीता आणि तिचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर गुन्हा दाखल करायला कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे गुन्हा दाखल करायला वेळ लागला असा नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे.