नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार नवरात्रीमध्ये म्हणजेच शेवटच्या सप्टेंबरमध्ये डीए वाढवू शकते. यासोबतच देशातील लाखो कर्मचाऱ्यांना सणानिमित्त वाढीव पगाराची भेट मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सरकार DA 4 टक्क्यांनी वाढवणार आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 38 टक्के होईल.
लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे
सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यास देशातील सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
1 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळू शकतो. डीएमध्ये ३८ टक्के वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात २७३१२ रुपयांची वाढ होणार आहे.
हे पण वाचा :
सनी लियोनीचा एथनिक लुक पाहिलात का? हे फोटो पाहून व्हाल घायाळ!
आईस्क्रीमचा हट्ट जीवावर बेतला ; इलेक्ट्रिकचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एकदा दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार
डीएची थकबाकी मिळेल
7 व्या वेतन आयोगामध्ये, सध्याच्या रचनेत, सर्व केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने DA आणि DR दिला जात आहे. परंतु, सप्टेंबरनंतर 38 टक्के दराने पेमेंट केले जाईल. यासोबतच तुम्हाला मागील २ महिन्यांच्या डीए थकबाकीचाही लाभ मिळेल.
27000 च्या जवळ पगार वाढेल
जर कर्मचार्यांचे मूळ वेतन 56900 रुपये असेल आणि त्यांना 38 टक्के दराने DA मिळेल, तर त्यांच्या खात्यात 21622 रुपये DA म्हणून येतील. सध्या या कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने 19,346 रुपये मिळत आहेत. 4 टक्के डीए वाढल्याने पगारात 2276 रुपयांची वाढ होईल, म्हणजेच तुमचा पगार दरवर्षी 27312 रुपयांनी वाढेल.