नाशिक : पालक आपल्या पाल्याचे सर्व हट्ट पूर्ण करतात मात्र नाशिक मध्ये चार वर्षीय मुलीचा आईस्क्रीमचा हट्ट पूर्ण करण जीवावर बेतले आहे. येथे आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा इलेक्ट्रिकचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रीष्मा विकास कुलकर्णी असे मृत मुलीचे नाव असून हि सर्व घटना मेडिकल मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही हृदयद्रावक घटना नाशिक शहरातील सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात घडली आहे.विशाल कुलकर्णी हे परिवारासोबत नाशिक मधील उंटवाडी येथे वास्तव्यास असून विशाल यांचा नाशिकमध्ये खाजगी व्यवसाय आहे. दरम्यान, ग्रीष्माने वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. ग्रीष्मा ऐकत नसल्याने अखेर वडील तिला जवळच असलेल्या मेडिकल मध्ये घेऊन गेले.
हे पण वाचा :
तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एकदा दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार
छोट्या शिवसैनिकाचे आदित्य ठाकरेंसमोरच घोषणाबाजी ; Video झाला तुफान व्हायरल
NHM : अमरावती येथे 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी.. त्वरित करा अर्ज
याचवेळी ग्रीष्मा ही आईस्क्रीमच्या फ्रिजसामोर उभी राहिली. तर तिचे वडील कुणाशीतरी फोनवर बोलत होते. याचवेळी ग्रीष्माला फ्रीजचा शॉक बसला. मात्र ती तशीच उभी असल्याने तिच्या वडिलाच्या हि बाब लक्षात आली नाही. ग्रीष्माच्या वडिलांचे फोनवर बोलणे देखील संपले. शेवटी काही मिनिटानंतर ती खाली कोसळली तेव्हा तिच्या वडिलांच्या लक्ष गेले. ग्रीष्माला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.