गाझिपूर : उत्तर प्रदेशातील गाझिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. ती म्हणजे लोकांनी भरगच्च भरलेली बोट अचानक नदीमध्ये उलटली झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या बोटीत जवळपास 25 लोक होते. गंगा नदीत ही बोट उलटली आहे.
या भीषण अपघातात बोटीतील 7 जण वाहून गेले. रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही दुर्घटना घडली आहे. गंगा नदीच्या पुरात बुडालेल्या 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पाण्यात बुडालेल्या 5 मुलांचा अद्याप शोध सुरू आहे. बोटीतील लोक जनावरांसाठी चारा घेऊन जात होते, त्याच दरम्यान बॅलन्स बिघडल्याने बोट बुडाल्याचे प्राथमिकदृष्या समोर आले आहे.
लोकांनी भरगच्च भरलेली बोट नदीत उलटली, दुर्घटनेचा लाईव्ह Video आला समोर pic.twitter.com/LAeniqw1va
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 1, 2022
या दुर्घटनेत ग्रामस्थांनी बुडणाऱ्या 12 लोकांना वाचवलं आहे. तर बाकी बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी यमुना नदीमध्ये बोट बुडून अशीच दुर्घटना घडली होती.