मुंबई : गिरगाव मधील शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग सपकाळ यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती. या दरम्यान, शिवसेना तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं म्हणत एका चिमुकल्यानं आदित्य ठाकरे यांच्या समोरच घोषणा दिलीय. आदित्य ठाकरे यांच्यासमोर घोषणा देणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल केलाय.
पाहा व्हिडीओ :
https://twitter.com/ssidsawant/status/1565874609416970240
चिमुकला घोषणा देतोय पाहून आदित्य ठाकरेही थांबले. सोबतचे कार्यकर्ते यांनाही चिमुकल्याच्या घोषणा ऐकून काहीसे चकीत झाले. प्रत्येकाच्या ओठांवर चिमुकल्याचा आत्मविश्वास पाहून स्मित हास्य उमटलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या चिमुकल्याचा हात धरला आणि तू कितवीत आहेस, असं विचारलं.