सर्वत्र पाण्याचा हाहाकार…. रेस्क्यू ऑपरेशन राबवले..
मुसळधार पावसाच्या तडाख्याने बागा अक्षरशः कोलमडून पडल्या,नदी नाले ओसंडून निघाले,पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य झाल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. तसेच बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच काही ठिकाणी काही नागरिक पाण्यात अडकल्यानं पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. दरम्यान, या ढगफुटी मुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
राज्यातील इतर भागाप्रमाणेच उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये हीच परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी ढगफुटी झाली. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नाशिकमधील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. एकदा फळबाग जमीनदोस्त झाल्यानंतर ती पुन्हा उभी राहायला पाच वर्षे लागतात.कांदा, मका, सोयाबिन, द्राक्ष आणि इतर फळबागा, भाज्यांची पीके उद्ध्वस्त झाली आहेत.