गुरुवारी सकाळी आठ वाजता ते दुचाकीने शिरसोली येथील मोठी बहीण मलेकाबी यांच्याकडे गेले. सकाळी तेथे नाश्ता केला आणि घरून निघून जात माझ्यासाठी कामावर डबा पाठवून दे असे बहिणीला सांगून घराबाहेर पडले. शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी दुचाकी लावून धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार शेख इरफान शेख याकूब मनियार सालार नगरातील हाजी अहमद नगरात आई फातेमाबी, पत्नी रुखसानाबी, मुलगा मुजाहिद, जयद, भाऊ सलीम व बहिणी यांच्यासह वास्तव्याला होते. हा प्रकारगुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे यशोधन ढवळे व समाधान टहाकळे घटनास्थळी धाव घेतली. शेख इरफान यांचे दोन तुकडे झालेले होते.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरात सर्व काही ठीक असताना शेख इरफान यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न नातेवाइकांनाही पडला आहे. जप्त मोबाईलमध्ये काही मिळतं का त्यादृष्टीने तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, लहान भाऊ व बहिणी असा परिवार आहे.
पत्नी दोन दिवसापूर्वीच माहेरी…
आत्महत्या करणाऱ्या व्यवसायिकाची पत्नी रुखसानाबी या दोन दिवसांपूर्वीच मुजाहिद व जयद या दोन मुलांसह नंदूरबारला माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान घरी एकटेच होते.