जळगाव- संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ हितेंद्र एस महाजन, आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूर यांना असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर इन इंडिया तर्फे कॉन्व्हेंशन 2019 साठी ‘प्रोफेसर अंबिकानन्दन मिस्रा रिसर्च एक्सलेन्स अवॉर्ड इन फार्मास्युटिक्स अँड ड्रग डिलेव्हरी पुरस्कार’ प्रदान करण्यात देण्यात आला.
डेराराडून इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि युनिव्हर्सिटी उत्तरांचल येथे झालेल्या विशेष समारंभात डॉ. महाजन यांना प्रोफेसर एस. के. कुलकर्णी माजी कुलगु डिग्री चंदिगड युनिव्हर्सिटी, डॉ. ए. एन. मिस्रा एम एस युनिव्हर्सिटी बरोडा व डॉ. पी. डी. चौधरी प्रेसिडेंट ऑफ असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर इन इंडिया यांचा हस्ते प्रदान करण्यात आला. सदरहू पुरस्कार फार्मसी विषयाच्या संशोधनासाठी प्रदान करण्यात येतो. डॉ हितेंद्र महाजन यांच्या फार्मसी विद्याशाखेतील विविध संशोधनात्मक आणि शैक्षणिक कामकाजाचा उल्लेखनिय कार्यामुळे देण्यात आलेला आहे.
संशोधन कार्याची घेतली दखल :
डॉ. हितेंद्र महाजन हे आर. सी. पटेल फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर येथे फार्मास्युटिकल्स आणि फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन क्षेत्रात संशोधनाचा चांगला अनुभव त्यांना आहे. यापुर्वीही त्यांना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली, यांच्याकडून गांधीयन युवा संशोधन पुरस्कार, सोसायटी फॉर रिसर्च अँड इनिशिएटिव्हज फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजीज अँड इन्स्टिट्यूशन्स आणि बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कडून संशोधन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संशोधन कार्यातील उललेखनिय कामगीरीत सातत्य :
फार्मास्युटिक्स आणि ड्रग डिलिव्हरी या क्षेत्रातील नामांकित जर्नल्समध्ये त्यांच्याकडे 120 हून अधिक संशोधन प्रकाशने आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या नावावर दोन संशोधनाचे पेटंट्स आहेत आणि त्यांनी 72 च्यावर एम फार्म विद्यार्थ्यांना आणि आठ पीएचडी अभ्यासकांचे मार्गदर्शन केले आहे. त्यांना एआयसीटीई, यूजीसी आणि एसईआरबी कडून 75 लाखाहून अधिक संशोधन अनुदानही मिळाले असून अनेक औषधी व संबंधित औषधांचा सल्लागार आहे. त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि इस्त्राईलचे अवकाश मंत्रालय आणि भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (एसईआरबी) कडे सादर केलेल्या संशोधन प्रस्तावाचे पुनस्र्ज्जीवन म्हणून काम केले आहे. ते प्राध्यापक विकास कार्यक्रम, सेमिनार आणि परिषदेसाठी अतिथी व्याख्याते आहेत. सध्या कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील शैक्षणिक समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहतात.
मान्यवरांनी केले अभिनंदन :
डॉ. महाजन यांच्या यशाबद्दल आर.सी.पटेल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. श्री. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष श्री. भूपेशाभाई पटेल, नगरसेवक श्री तपनभाई पटेल, तसेच उपाध्यक्ष श्री. राजगोपालजी भंडारी, विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा व उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर तसेच सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.