जळगाव,(प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिखली येथे शेतकरी नेहमी प्रमाणे शेतात जाण्यासाठी गावातून जात असतांना अचानक बैलगाडीवर विजेचा तार पडल्याने शेतकरी आणि बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळ हळ व्यक्त होतं आहे. सदर घटना आज १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर गावाकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.दरम्यान मृत यशवंत महाजन यांच्या पश्चात पत्नी अनुसयाबाई, मुलगा विकास असा परिवार आहे.
महावितरणच्या कारभारावर गावकऱ्यांचा संताप…
आज यावल तालुक्यातील चिखली गावातून शेतकरी यशवंत कामा महाजन (वय 65 वर्षे, रा. चिखली बुद्रूक) हे नेहमी प्रमाणे शेतात जाण्यासाठी निघाले मात्र गावातून जात असतांना विद्युत प्रवाह असलेली विजेची तार बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान महावितरण कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेला बैल आणि त्यावर शेतकऱ्याचा मृतदेह असं दृश्य बघून यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
महावितरणचं दुर्लक्ष…
गावात काल रात्री जोरदार पाऊस झाला होता. या जोारदार पावसामुळे महावितरण कंपनीचे आधीच सैल असलेले वीजेचे तार तुटले असावेत आणि त्यातून ही मोठी घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस पाटील भागवत पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली आहे.त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.महावितरणने वेळीच लक्ष देऊन जर हे वीजेचे तार ओढून घेऊन व्यवस्थित केले असते तर कदाचित आज ही घटना घडली नसती, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे