‘जूप’ ची ‘जिओ हॅप्टिक’ सोबत भागिदारी…
‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’ सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे. सध्या १०० पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.जेवण मागवताना प्रवाशांना आपल्या पीएनआरचा वापर करावा लागेल. प्रवाशांस थेट त्यांच्या ‘सीट’जेवण मिळेल.
आपल्या जेवणाची अशी करा ऑर्डर…
स्टेप 1: तुम्ही WhatsApp वर जाऊन झूप चॅटबॉट नंबर +91 7042062070 वर टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. गोष्टी सुलभ करण्यासाठी तुम्ही हा नंबर सेव्ह करु शकता आणि जाता जाता जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तेव्हा त्याच्याशी चॅट करु शकता. तसेच Zoop सोबत चॅट सुरु करण्यासाठी तुम्ही [https://wa.me/917042062070] नेव्हिगेट करु शकता.
स्टेप 2: तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा आणि फक्त ‘हाय’ टाइप करुन Zoop क्रमांक +91 7042062070 वर पाठवा.
स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला Zoop कडून एक रिप्लाय मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला फूड ऑर्डर करायचे आहे का, पीएनआर स्टेटस तपासा, ऑर्डर ट्रॅक करा असे विचारले जाईल. तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.
स्टेप 4: जर तुम्हाला फूड ऑर्डर करायचे असेल तर तुम्हाला Order a Food या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक द्यावा लागेल.
स्टेप 6: यानंतर तुम्हाला पीएनआर आणि इतर तपशीलांची पुष्टी करण्यास सांगितले जाईल.
स्टेप 7: एकदा तुम्ही सर्व तपशील अचूक असल्याची पुष्टी केल्यावर, तुम्हाला तुमचे Food जिथे पोहोचवायचे आहे ते स्टेशन निवडण्यास सांगितले जाईल.
स्टेप 8: स्टेशन निवडल्यानंतर, तुम्हाला ते रेस्टॉरंट निवडावे लागेल, ज्यामधून तुम्हाला तुमचे जेवण ऑर्डर करायचे आहे.
स्टेप 9: मग तुम्हाला खाण्याची इच्छा असलेली डिश निवडा.
स्टेप 10: एकदा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा तपशील मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुढे जावे लागेल.
तुम्ही UPI, Netbanking इत्यादी सेवांद्वारे पेमेंट करु शकता.