एरंडोल,(प्रतिनिधी)- एरंडोल तालुक्यात विजचोरी वर नियंत्रण करण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे वीज चोरी करणाऱ्या गिऱ्हाईकांच्या घरांवर तालुक्यात संपूर्ण छापे मारून सुरू आहे. या अनुषंगाने आज दिनांक 30 ऑगस्ट सकाळी एरंडोल -तालुक्यातील पिंपळकोठा विभागांतर्गत जावखेडा गावात महावितरणतर्फे वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक गेले असतात या पथकावर एकाने हल्ला करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे.
VIDEO ; वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वायरमनास लाकडी दांड्याने मारहाण ; पहा व्हिडीओ pic.twitter.com/L80trODhCN
— Pravin sapkale (@Pravinsapkale17) August 30, 2022
पिंपळकोठा विभागांतर्गत जवखेडा गावात अभियंता इच्छानंद पाटील, जनमित्र अक्षय महाजन , पंकज येवले, सुनील महाजन यांचे पथक वीज चोरी विरोधात मोहीम राबवीत होते. दरम्यान, मनोज प्रताप पाटील या ग्रामस्थाने आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा आकोडा काढून टाकल्याने मनोज पाटील यांनी लाडकी दांडक्याने पथकातील सदस्यांना मारहाण केली.
या मारहाणीत अक्षय महाजन हे जखमी झाले आहेत. यांनतर जखमी अक्षय महाजन यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सर्व वैद्यकीय अहवाल आल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येईल, असे एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले आहे.