संतप्त झालेल्या रुग्णाच्या चार – पाच नातेवाईकांनी रुग्णालयात ठेवलेल्या खुर्ची, स्टँड आणि हाताने डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सदर घटना रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.हा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील एका रुग्णालयात घडला आहे.
व्हिडीओत काय दिसत आहे….
रुग्णालयातील एका वार्डात डॉक्टर एका व्यक्तीशी बोलतांना दिसत आहे, डॉक्टर बोलत असतांना अचानक पणे संतप्त झालेल्या रुग्णाच्या चार – पाच नातेवाईक रुग्णालयच्या वार्डात प्रवेश करून डॉक्टर वर हल्ला चढावतात.. तसेच मारहाण करतेवेळी रुग्णालयात ठेवलेल्या खुर्ची, स्टँड आणि हाताने डॉक्टरला बेदम मारहाण करतांना दिसत आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी इतर रुग्ण देखील वार्डात उपचारर्थ दाखल असल्याचं दिसत आहे.या मारहाणीत रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर लोकांनी हस्तक्षेप केला. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील एका रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण… pic.twitter.com/hi8evH6J5p
— Pravin sapkale (@Pravinsapkale17) August 30, 2022
डॉक्टरला जमिनीवर पाडून मारहाण…
व्हिडिओमध्ये दिसतं आहे की चार पाच लोक डॉक्टरवर हल्ला करू लागतात. हे लोक डॉक्टरला जमिनीवर पाडतात आणि मारहाण करतात. यादरम्यान डॉक्टर स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात मात्र, मारहाण करणारे लोक जास्त असल्याने याचा काहीही उपयोग होत नाही. यावेळी उपचारार्थ दाखल असलेले रुग्णही या विचित्र घटनेमुळे घाबरून गेले होते.