स्त्री शक्ती आणि समाज” या विषयावर महाविध्यालयात नाटिका सादर
जळगाव – विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी “सीता स्वयंवर” हे मराठीतील पहिले नाटक रंगभूमीवर आणून मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. ह्या गोष्टीची आठवण ठेवत आपण हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो. रंगभूमी अधिक पोषक, समृद्ध आणि लोकाभिमुख करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा आजचा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील ड्रामा क्लबच्यावतीने मराठी रंगभूमी दिन श्री नटराज पूजनाने व “स्त्री शक्ती आणि समाज” या विषयावरील नाटिका सादर करून महाविध्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी विध्यार्थी कलावंताच्या हस्ते श्री नटराज पूजन करण्यात आले.
तसेच आपल्या मनोगतातून त्यांनी जळगावच्या रंगभूमीचा उज्जवल काळ सध्या सुरू असल्याचे आणि जळगावचे कलावंत नाट्य, चित्रपट व दूरदर्शन मालिकेमध्ये जळगावचे नाव गाजवत असल्याचा अभिमान व्यक्त केला. याप्रसंगी प्रा. मकरंद वाठ, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, प्रा. कल्याणी नेवे व आदी विध्यार्थी रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी केले.