जळगाव : राज्यभरात मोठ्या उत्साहाने बैलपोळा साजरा होत असताना मात्र जळगाव तालुक्यातील वावडदा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एक बिथरलेला बैल अचानक छतावर चढला आणि वरतून खाली कोसळला.या घटनेत बैल गंभीर जखमी झाला असून या घटनेचा व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पोळा सणानिमित्त वावडदा येथील शेतकरी सुधाकर रतन राजपूत हे शुक्रवारी दुपारी त्यांच्या मालकीचा बैल घेऊन गोपाळवाडा भागातून जात होते. त्यावेळी अचानक बैल बिथरला आणि तो एका घराच्या जिन्यावरून छतावर चढला. राजपूत यांनी बैलाला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिथरलेला बैला थेट छतावरून खाली कोसळला.
जळगाव : बैलपोळ्यालाच बैल बिथरला, छतावर चढला आणि थेट खाली कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO pic.twitter.com/ivFasQoVgm
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) August 27, 2022
शिंगाला ईजा झाल्यामुळे बैल गंभीर जखमी झाला. रक्तस्त्राव होत असल्यामुळे बैलावर तातडीने उपचार करण्यात आले. दरम्यान, बैलाची प्रकृती स्थिर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, घटनास्थळी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती.