पाटबंधारे विभाग अकोला येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची जाहिरात अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल (Junior Engineer Civil) च्या एकूण ३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक पात्रता :
यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इंजिनिअरिंग डिप्लोमापर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागातून सेवा निवृत्त अधिकारी पदांवरून निवृत्त असलेल्या उमेदवारांना या नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
भारतीय खाद्य निगममध्ये निघाली बंपर भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे मोठी भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल
IPRCLमध्ये मेगा भरती, पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!
नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
९ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला येथे पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा