पाचोरा, (किशोर रायसाकडा)- नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेनेवर २०० कोटी रूपयांच्या भुखंडाची फसवणुक करण्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केला असुन हा आरोप तथ्यहिन असुन पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर जनतेची दीशाभुल करण्याचा व आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.याउलट अमोल शिंदे यांना याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.त्यांनी व त्यांच्या नात्यातिल सदस्यांनी सत्तेत असतांना अनेक खुल्या जागांवर आपली मालकी दाखवत आपले व्यवसाय सुरू ठेवले असुन येणार्या काळात ह्या सर्व खुल्या जागा मुक्त करण्यासाठी कायदेशिर लढा देणार असुन सुरूवात त्यांनी केली असुन शेवट मी करणार असल्याचा ईशारा आमदार किशोर पाटिल यांनी पञकार परिषद घेउन दिला.
येथिल शिंदे गटातिल आमदार किशोर पाटिल यांनी त्यांच्या निवासस्थानी २०० कोटी रूपायांच्या भुखंड अपहाराच्या आरोपा विरुध्द पञकार परीषद घेण्यात आली.यावेळी आमदार किशोर पाटिल,लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल,मुकुंद बिल्दिकर,रावसाहेब पाटिल,शितल सोमवंशी,राम केसवाणी,सतिष चडे,बंडु चौधरी,सुनिल पाटिल,रहिमान तडवी,किशोर बारावकर यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक आणी पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षित भुखंडाच्या अपहाराचे आरोप हे नगरपालिका सत्ताधारी व प्रशासनावर केले असले तरी नगरपालिकेत माझी सत्ता असल्याने या सर्व प्रकरणाला मी उत्तर देणार असल्याचे आमदार किशोर पाटिल यांनी अगोदर स्पष्ट केले.
या पञकार परिषदेचे प्रास्ताविक करतांना मुकुंद बिल्दिकर यांनी सांगितले की,ज्या भुखंडांवरिल आरक्षण उठवण्याचे काम नगरपिलिकेने ठराव करून केले आहे ती सर्व प्रक्रिया ही कायद्याच्या चौकटित राहुन केली आहे.याअगोदर असे अनेक आरक्षण काढल्या गेली असुन ज्या जमिन मालकांचे आरक्षण काढण्याची प्रक्रिया केली गेली त्यांनीच नगरपालिका प्रशासनाला विनंती अर्ज केले होते.त्यांची परिस्थीही ही हालाकिची असल्याने नगरपालिका प्रशासनाला ही भुमिका घ्यावी लागली असुन ह्या जमिनी कुणाच्या बापाची नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटिल म्हणाले की, आरक्षित असलेल्या शेतजमिनिंवरिल आरक्षण उठवण्याची प्रक्रीया गेल्या अनेक वर्षात झाल्या आहेत.यात नविन असे काही नाही.ज्या कारणांसाठी या जमीनी आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यातिल बहुतांशी विकास कामे शहरात झाली आहेत. तर ज्यासाठी शेतजमीन आरक्षित आहे तो प्रकल्प राबवण्यासाठी ती शेतजमीन शेतकर्यांकडुन विकत घेण्या इतपत नगरपालिकेची आर्थिक परिस्थीती नसुन शेतजमीनीवर आरक्षण आल्याने या कुटुंबांची आर्थिक स्थीती खुप खालावलेली होती.
मुळ शेतमालकाने नगरपालिकेला दिलेल्या अर्जाप्रमाणे ठराव मंजुर करून त्याबाबतच्या सर्व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करूनच हे आरक्षण उठवण्याचे काम सुरू आहे.या जमीनींची २०० कोटी रूपये किंमत विरोधकांनी काढतांना थोडा विचार करायला हवा होता. शेतजमीन ही शेतमालकाची असुन ती त्याची खाजगी मालमत्ता आहे.यात नगरपालीका प्रशासन व सत्ताधारी यांना कुठलाही सहभाग नाही.फक्त त्या शेतजमीनिवरिल आरक्षण उठवणे म्हणजे अपहार करणे असा त्याचा अर्थ होत नाही.याउलट ज्यांनी आरोप केले त्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड.अभय पाटिल यांच्याबाबत सर्व मतदार संघाला माहीती आहे.सोबतच भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आरोप करतांना आपले व्यवसाय कोणत्या जागांवर कसे सुरू आहेत याचा विचार अगोदर करायला हवा होता. शहरातिल विवेकानंद नगरमधिल शाळा,नवजिवन सुपर शाॅप चे बांधकाम, पाचोरा सेंट्रल माॅलचे बांधकाम,जारगाव मधिल नुरानी नगर मधिल खुला भुखंड आणी गाडगेबाबा नगर मधिल डेअरी हे सर्व व्यवसाय कोणत्या जागावर कसे सुरू आहेत हे जनतेला सांगायला नको.आज आमच्यावर आरोप करून जनतेची दिशाभुल करणार्यांचा येणार्या काळात कायदेशिर समाचार घेतला जाणार असुन राज्यात शिंदेगटाच्या माध्यमातुन मी जरी भाजपा पक्षासोबत असलो तरी मतदार संघात भाजपाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.किशोर पाटिल विरुध्द अमोल शिंदे हे चिञ कायम राहिल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.आमच्यावर झालेल्या आरोपा विरुध्द आम्ही मानहानीचा दावा लवकरच दाखल करणार असुन या दाव्या अगोदर कायदेशिर नोटिस देण्याचे काम पुर्ण करण्यात आल्याचीही माहीती त्यांनी यावेळी दिली.
पञकार परिषद सुरु होतांनाच आमदार किशोर पाटिल यांनी नगरपालिकेत सत्ता माझी होती त्यामुळे झालेल्या सर्व आरोपांना मी उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केल्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक हे शांत बसुन होते.आमदारांसोबत त्यांचे मिञ मुकुंद बिल्दिकर माञ या प्रकरणी आक्रमक भुमिकेत दिसुन आहे.या पञकार परिषदेत आरोपांचे खंडण करतांना विरोधकांवर आरोप झाले माञ आरोपांच्या खंडणाबाबत कोणतेही कागदपञे सादर करण्यात न आल्याने अनेक प्रश्न ही अनुत्तरीतच राहीली.