मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यांनतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाला. मात्र अशातच राज्यात एक महत्त्वाचं समीकरण उदयाला आलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केलंय.
मुंबईत आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना एकत्र येण गरजेच असल्याचे संभाजी बिग्रेडच्या प्रमुख प्रवक्त्याने म्हटले आहे.
हे पण वाचा :
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. सणावाराच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा घसरणार
खळबळजनक ! ८५ वर्षांच्या आजोबांने केला दहा वर्षाच्या नातीवर अत्याचार
आमदार, मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या वेतनात वाढ ; आता ‘इतका’ मिळेल पगार
शुक्रवारची ‘ही’ युक्ती आहे खास, कर्ज आणि पैशाचे संकट चुटकीसरशी दूर होईल!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या नव्या युतीचे स्वागत केलं आहे. शिवप्रेमी असल्याने आपलं रक्त एकच आहे. सध्या आमच्याकडे काही नसताना सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटतं असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असंही ठाकरे म्हणाले.