मुंबई : लांब मार्गांवर रेल्वे प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित आहे. यामुळेच बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. तुम्हीही सहसा ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित नियम माहित असले पाहिजेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून विविध नियम केले जातात. रेल्वेशी संबंधित असा नियम जाणून घ्या, ज्याचा संदर्भ देऊन तुम्ही तुमचा रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी करू शकता.
खालच्या बर्थवर झोपताना त्रास होतो
थ्री टायर कोच म्हणजेच थर्ड एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करताना सर्वात मोठी समस्या मधल्या बर्थची असते. अनेकदा खालच्या बर्थचा प्रवासी रात्री उशिरापर्यंत सीटवर बसून राहतो, त्यामुळे मधल्या बर्थच्या प्रवाशाला इच्छा असूनही आराम करता येत नाही. अनेक वेळा असे देखील होते की मधल्या बर्थचे प्रवासी रात्री उशिरापर्यंत खालच्या बर्थवर बसतात, त्यामुळे खालच्या बर्थवर झोपायला त्रास होतो.
रेल्वे नियम पहा
जर तुमच्यासोबत कधी असं झालं असेल तर तुम्हाला रेल्वेच्या नियमांची माहिती घ्यावी. रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मधला बर्थ उघडू शकता. म्हणजेच, जर तुमच्याकडे लोअर बर्थ असेल, तर रात्री 10 नंतर मिडल बर्थ किंवा वरच्या बर्थचा प्रवासी तुमच्या सीटवर बसू शकत नाही. तुम्ही रेल्वेच्या नियमांचा संदर्भ घेऊन तुमची सीट रिकामी करण्यास सांगू शकता. याशिवाय, मिडल बर्थ असलेल्या प्रवाशाने दिवसा त्याची सीट उघडली तरीही तुम्ही त्याला रेल्वेचे नियम सांगू शकता.
हे पण वाचा :
झेडपी शिक्षकाने काढली भाजप आमदाराची लाज,… संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
‘खाऊन 50 खोके माजलेत बोके, विरोधकांच्या घोषणाबाजीनं विधानभवनाचा परिसर दणाणला
मुंबई पोलिसांना हल्ल्याची धमकी, आता पोलीस तपासातून समोर आली ‘ही’ मोठी माहिती
तरुणांसाठी खुशखबर.. राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती ; गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
टीटीई तिकीटही तपासू शकत नाही
ट्रेनमध्ये झोपल्यानंतर टीटी तिकीट तपासण्यासाठी उठतात, अशी प्रवाशांची अनेकदा तक्रार असते. अशा परिस्थितीत त्यांची झोप भंग पावते आणि समस्या निर्माण होतात. प्रवाशांचा हा त्रास दूर करण्यासाठी आणि प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वेच्या नियमांनुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत टीटी प्रवाशांच्या झोपेच्या वेळी तिकीट तपासू शकत नाही. पण जर तुमचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला तर हा रेल्वे नियम लागू होत नाही.