मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र आजही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके माजलेत बोके, ईडी सरकारचे करायचे काय-खाली डोके वर पाय, अशा घोषणाबाजीने विधानभवनाचा परिसर दणाणून गेला.
घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 50 खोके एकदम ओके अशा घोषणाबाजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक करीत असून पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला होता. 50-50 बिस्कीट पुडे घेऊनही विरोधकांनी आंदोलन केले होते. हातात फलक घेऊन जोरजोरात घोषणाबाजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर करण्यात आली. आजही महाराष्ट्र के गद्दारोंको, जुते मारो, सालों को, ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या.
हे पण वाचा :
मुंबई पोलिसांना हल्ल्याची धमकी, आता पोलीस तपासातून समोर आली ‘ही’ मोठी माहिती
तरुणांसाठी खुशखबर.. राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती ; गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
महाराष्ट्र हादरला ! विद्यार्थिनीचे अपहरण करून धावत्या कारमध्येच केला बलात्कार
मृत्युच्या १२ तासानंतर मुलगी झाली जिवंत ; अंत्यसंस्काराला उपस्थित सर्वच अवाक….
काल सत्ताधारी विशेषत: शिंदे गटाचे आमदार आणि विरोधी पक्ष आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. आज दोघांनीही घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी करत सरकारचा निषेध केला. राज्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. मात्र मदत देणे तर दुरच मात्र केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.