थेट शाळेत घुसून एका शिक्षकाला विदयार्थ्यांच्या व इतर शिक्षक स्टाफ च्या समोर PWD अभियंत्याकडून शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली सदर घटनेचा व्हिडीओ शाळेतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. शिक्षकाला वर्गाबाहेर बेदम मारहाण घटना 18 ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शिक्षकाला मारहाण झाल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.सदर घटना गोव्यातील असल्याचे समजते.
PWD अभियंत्याकडून गोव्यातील शिक्षकाला बेदम मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/YnOuc4fXKS
— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2022
या प्रकरणी वालपोई येथील एका शालेय शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी पीडब्ल्यूडी अभियंत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अल्ताफ शेख असे या अभियंत्याचे नाव असून व्हिडिओमध्ये तो गोव्यातील एका शाळेतील शिक्षकाला मारहाण करताना दिसत आहे.
व्हिडीओ मध्ये काय दिसत आहे…
शिक्षकाला मारहाण करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वर्गाबाहेर उभा आहे. तो शिक्षक वर्गातून बाहेर येण्याची वाट पाहत आहे. इतक्यात शिक्षक बाहेर आले. हे पाहून अभियंता त्याच्याकडे धाव घेतो आणि मारहाण करू लागला. तो सुरुवातीला शिक्षकाच्या कानशिलात लगावतो आणि नंतर बाजूला घेऊन त्याला बेदम मारहाण करताना दिसतांना आहे.
अखेर त्या मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल…
शिक्षकाला मारहाण होतं असतांना उपस्थित शिक्षक कर्मचारी त्या व्यक्तीला थांबाविण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.मात्र तो अभियंता कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. विद्यार्थी सुद्धा वर्गा बाहेर येऊन हा सर्व प्रकार पाहत असतांना व प्रचंड जनसमुदाय जमल्यानंतरही हा माणूस शेवटपर्यंत शिक्षकेला मारहाण करत राहतो. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.