बदलापूर : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला दिसत नाही. अशातच आता बदलापुरातून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर तरुणाने तब्बल चार महिने संतापजनक कृत्य केलंय.
विशेष बलात्कार करण्यात आलेल्या पीडित तरुणी गर्भवती राहिल्याचं समजल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आला. रुग्णालयात घेऊन यात या पीडितेचा गर्भपात करण्यासाठी अत्याचार करण्यात आलेल्या आरोपीच्या मित्रांनी प्रयत्न केल्याचंही समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध अद्यापही सुरु आहे. बलात्काराच्या गुन्ह्यासह एट्रॉसिटी कायद्याअंतर्गही बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, हे संतापजनक कृत्य एका आदिवासी तरुणीसोबत घडलंय. शमशान अन्सारी असं या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे. कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. शमशाद अन्सारी आणि पीडित तरुणी हे एकाच कारखान्यात कामाला होते. याच दरम्यान पीडित तरुणीच्या जेवणात गुंगीचा औषध मिसळून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अन्सारी यांनी तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान अत्याचाराचा व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडित तरुणीवर चार महिने अत्याचार करत होता.
पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने अन्सारी याचे मित्र सागर कदम आणि मुकेश दिनगर यांनी तिचा रुग्णालयात येऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. या संबंधीच्या तक्रारीनंतर हे सर्व धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांनी बलात्कार, गर्भपात करण्याचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केलाय. सध्या मुख्य आरोपी अन्सारी हा अजूनही फरार आहे, तर गर्भपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.