मुंबई : तुम्ही जर सोने खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज मंगळवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. दोन दिवसांत 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 800 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीत ही फरक पडला आहे.
सोन्याच्या किंमती घसरल्याने जागतिक मंदीच्या चर्चांचा सोन्यावर फार मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात देखील सोने दरात मोठी घसरण झाली होती. सणासुदीत सोने स्वस्त होण्याची चिन्हे दिसून येतेय.
अशी झाली घसरण
रविवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,800 रुपये होता, सोमवारी हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 200 रपयांनी घसरल्यानंतर दर 47,600 रुपये होता. मंगळवारी हाच भाव 600 रुपयांनी घसरला आणि 10 ग्रॅमसाठी 47,000 रुपयांवर स्थिरावला. तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी रविवारी 52,150 रुपये दर होता सोमवारी हा दर 10 ग्रॅमसाठी 220 रुपयांनी घसरून 51,930 रुपये झाला. तर मंगळवारी 10 ग्रॅमसाठी 700 रुपयांची घसरण होत हा भाव 51,230 रुपये झाला. चांदीचा भाव रविवारी 55,600 रुपये किलो होता. तो 400 रुपयांनी घसरुन सोमवारी 55,200 रुपये किलो झाला. मंगळवारी भाव पुन्हा 400 रुपयांनी घसरुन 54,900 रुपये किलो झाला.
हे पण वाचा :
चोपड्यात पोलिसांची मोठी कारवाई ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूससह दोघे जेरबंद
उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंनी दिले ‘हे’ संकेत
ह्दयद्रावक! सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू, थरार व्हिडिओ समोर
बीटरूट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती नसेल? जाणून लगेचच खाणे सुरु कराल
काय आहे राज्यातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,000 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,230 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,030 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,260 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,030 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,260 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,030 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,260 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 552 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.