चोपडा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा अवैध धंद्यांचे केंद्र बनत चालले असून गुटखा, गांजानंतर आता गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट समोर येत आहे. चोपडा येथे पोलिसांनी धडक कारवाई करत हरियाणाच्या दोघांना तब्बल घेतलं आहे. त्यांच्याकडून तब्बल १२ गावठी कट्टे, मॅगझीनसह ५ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
चोपडा परिसरातच गावठी पिस्तूल विक्री करणारे रॅकेट सुरु असून मध्यप्रदेशातून आणि सातपुड्याच्या कान्याकोपऱ्यातून विक्रेते चोपड्यात येत असतात. वर्षभरात अनेकदा पोलिसांनी गावठी कट्टे विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशातच आता सोमवारी चोपडा बस स्थानक परिसरात संशयित आरोपी अमीतकुमार धनपत धानिया (वय 30 रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी,हरीयाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय 32 रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी, हरीयाणा) यांच्याकडे 2 लाख ६० हजार किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच हजार रुपये किमंतीची 5 पिवळया धातूचे जिवंत काडतूस हे कोणास तरी विक्री करण्यासाठी आणले होते.
हे पण वाचा :
उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंनी दिले ‘हे’ संकेत
ह्दयद्रावक! सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू, थरार व्हिडिओ समोर
बीटरूट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती नसेल? जाणून लगेचच खाणे सुरु कराल
परंतू पोलिसांनी दोघांना सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. दोघं संशयित आरोपींवर पोहेका किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं संशयित आरोपींजवळून १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस व ३ मोबाईल फोन असा एकुण २ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.