मुंबई : दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यादरम्यान, अनेक गोविंदा जखमी झाले होते. यापैकी विलेपार्ले येथील शिवशंभू गोविंदा पथकांचा सदस्य संदेश प्रकाश दळवी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू झाला. संदेश दळवी याच्या मेंदूला दुखापत झाल्याने तो दोन दिवस रुग्णालयात होता.मात्र, दोन दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर सोमवारी रात्री संदेश दळवीची प्राणज्योत मालवली. दरम्यान, संदेश दळवी याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयाची मदत देण्याचे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन
शिवशंभो गोविंदा पथकाचा संदेश प्रकाश दळवी हा विलेपार्लेमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी सातव्या थरावर चढला, पण त्याचा पाय सटकला आणि तो खाली पडला.संदेश दळवी हा सातव्या थरावरून कसा कोसळला, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मेंदूला दुखापत झाल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले, पण डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. 22 वर्षांचा संदेश दळवीच्या घरात आई-वडील आणि तीन भावंडं आहेत. मूळचा पार्ल्याचा असलेला संदेश सध्या कुर्ल्याला राहत होता.
मुंबईमध्ये सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू#DahiHandi #Govinda #Mumbai pic.twitter.com/QpUCGmufQa
— News18Lokmat (@News18lokmat) August 22, 2022
शिंदे सरकार आर्थिक मदत देणार?
राज्य सरकारनं सुरुवातीला दहिहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना १० लाखांचं विमा संरक्षण देणार असल्याची सुरुवातीला घोषणा केली होती. त्यामुळे आता राज्य सरकार संदेश दळवीच्या कुटुंबीयांना नेमकी किती मदत देणार हे पाहावे लागले. राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी संदेश दळवीच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत दिली जाईल, असे सांगितले. शासनाने जाहीर केल्या प्रमाणे त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देऊ. तसेच संदेशची घरची परिस्थिती पाहून आणखी मदत करता येईल का? हे देखील बघत आहोत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.