मुंबई – अत्यंत संतापजनक घटना समोर आली असून दोन मुलांची आई असलेल्या स्वतःच्या पत्नीला रेल्वे खाली ढकलून तिची हत्या करणारी घटना वसई रेल्वे स्टेशनच्या ५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली रेकॉर्ड झालेलं हे दृश्य पाहून हृदयाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.. पतीच्या क्रूरते बाबत सर्वत्र संताप व्यक्त होतं आहे.
काय आहे घटना…
वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर पती पत्नी व त्यांच्या सोबत पोटची दोन मुलं थांबलेली दिसत आहे तर पत्नी मुलांना घेऊन प्लॅटफार्म वर एका कडेला झोपलेली दिसत आहे. तर पती ट्रेन ची वाट पाहताना दिसत आहे…रेल्वे नजदिक आल्याचे पाहून पतीने महिलेला झोपेतून उठवून ट्रेन खाली ढकलले या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा संपूर्ण थरार चित्रित झाला आहे.सदर घटना सोमवारची आहे.
पतीने दोन मुलांची आई असलेल्या पत्नीला रेल्वे खाली ढकलले… pic.twitter.com/tRcnJ0O7iy
— Pravin sapkale (@Pravinsapkale17) August 23, 2022
पत्नीला ढकलून दिल्यावर ‘तो’ पळाला…
पत्नीला ट्रेनखाली ढकलून दिल्यानंतर त्याने आपल्या दोन मुलांना घेतलं आणि तेथून घाईघाईत पळाला झाला. त्याने केलेल्या या क्रूर कृत्यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. वसई रेल्वे पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे.