पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात हे काय सुरु आहे असाच प्रश्न आपल्याला पडला असेल आणि असा प्रश्न मनात येणं देखील सहाजिकच आहे…. कारण पुण्यात एक संतापजनक घटना समोर आल्याने धाक्काचं बसला आहे.पुण्यातील एका शिक्षित व्यापाऱ्याने मुलगा व्हावा यासाठी एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरात अघोरी पूजा केली आणि स्वतःच्या पत्नीला मांत्रिकाच्या सांगण्यावरून रायगड येथे नेत तिला सर्वांसमोर आंघोळ करायला लावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिला पोलिसात गेली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील त्या व्यापाऱ्याचे नावं शिवराज कोरटकर (वय ३६),असून सासरे राजेंद्र कोरटकर (वय ६४), सासू चित्ररेखा कोरटकर (वय ६२), मांत्रिक मौलाना बाबा जामदार अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांसमोर कैफियत मांडत फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जादू टोणा आणि नरबळी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ३ मे २०२२ ते आजपर्यंतच्या कालावधी मध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे शिवराज कोरटकर यांच्याशी विवाह झाला होता. सुरवातीचे काही दिवस दोघे चांगले नांदले. मात्र, काही दिवसानंतर पैशासाठी पीडितेचा छळ करण्यात येऊ लागला. तिला मारहाण केली जात होती. एव्हढेच नाही तर लग्नात मिळालेले दागिने पीडितेचा विश्वास संपादन करून आपल्या जवळ ठेवण्यास सांगितले. मात्र, शिवराज याने ते दागिने परस्पर विकले. एवढेच नाही तर फिर्यादीच्या नावावर असलेल्या फ्लॅटचे कागदपत्रे ही परस्पर बँकेत देऊन त्यावर खोटी सही करून बँकेकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. हा प्रकार होऊनही घरात सुख आणि शांतता नांदावी यासाठी तसेच मुलगा व्हावा यासाठी घरात मांत्रिकाला बोलावले. त्यांच्या सांगण्यावरून पीडितेला रायगड येथे नेऊन मुलगा व्हावा यासाठी सर्वांसमोर आंघोळ करायला लावली. या नंतरही पीडितेला वारंवार मारहाण करण्यात येतं होती. अखेर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला आहे.