मुंबई : आपल्या बोल्ड फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिच्या कपड्यांवरून तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. मात्र यावरती गप्प न बसता ती ट्रोलर्सना साडेतोड उत्तर देते. अशातच यावेळेस उर्फी जावेदने तिच्यावर कमेंट करणाऱ्यांना चांगल्याच पद्धतीने उत्तर दिलं आहे. याबाबत तिने व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
उर्फी जावेद हिने बनवला दगडांचा ड्रेसः
उर्फी जावेच्या एका फोटोवर एका युजरने हिला दगडी मारा अशी कमेंट केली होती. या कमेंटची प्रेरणा घेत उर्फी जावेदने फेकलेल्या दगडांपासून चक्क ड्रेसच तयार केला. हा ड्रेस देखील तिचा बोल्ड स्टाईलमध्ये आहे.
रंगीबिरंगी दगडांच्या सहाय्याने उर्फीने ब्रालेट आणि शॉर्ट स्कर्ट बनवला आहे. याचा तिने एक व्हिडिओ देखील इन्स्टाग्राम वर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओवर उर्फीच्या फॅन्सकडून भरभरून लाईक आणि कमेंटचा पाऊस करण्यात आला आहे.
उर्फी जावेद हिचं व्हिडीओ कॅप्शनः
दरम्यान, केलेल्या कमेंट्सने मला हे करण्याची प्रेरणा दिली असून मला दोष न देता कमेंट करणाऱ्यांना दोष द्या, असं तिने कॅप्शनमध्ये लिहलं आहे.