मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार होती. मात्र काही कारणांमुळे सुनावणी आता उद्या होणार आहे. याबाबत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे.
त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज ऐवजी सुनावणी उद्या २३ ऑगस्ट, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची आणि शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार का, याच्या निकालासाठी आणखी एका दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे पण वाचा :
तरुणाच्या हत्त्येने यावल तालुका हादरला : चितोड्यातील तरूणाची क्रूर हत्या
..पण दुसऱ्या दिवशी गुलाबराव पाटील पळून गेले ; या नेत्याचा मोठा खुलासा
दर्दनाक घटना ; आईने मुलीचे हात बांधले तर वडिलांनी कापली मान, प्रेमाची वेदनादायक शिक्षा
बापरे हे तर भयानकचं ; पतीला ठार मारलं आणि नंतर त्याचे मांस शिजवून खाल्ले…
दरम्यान, शिवसेनेच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या रुपात पाहिलंय. त्यानंतर विस्कळीत झालेली शिवसेनेची घडी बसवण्याचं आव्हानही उद्धव ठाकरेंसमोत आहे. शिवाय धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार, यावरुनही चढाओढ पाहायला मिळतेय. त्यासाठीही कागदोपत्री लढा सुरु असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. या सगळ्या अनुशंगाने करण्यात आलेल्या एकूण पाच याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात एका विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.