मृत माणसाला शिजवून खाण्याची बातमी तुम्ही कधी ऐकली पण नसेल आणि असं काही होऊ शकतं याची साधी कल्पना सुद्धा डोक्यात येऊ शकत नाही मात्र प्रत्यक्षात अशी घटना घटना घडली असून या घटनेनें सर्वत्र शॉक बसला आहे. पत्नीने आधी पतीला ठार मारलं आणि नंतर त्याचे अवयव चक्क शिजवून खाल्ले ही घटना आहे इराणमधील तेहरानच्या एस्लामशहरातील…. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर धक्काचं बसला आहे.
हृदयाला धडकी भरणारी घटना….
हृदयाला धडकी भरणारी ही घटना असून जगातील ही पहिलीच विचित्र व माणसाचे होश उडवून देणारी घटना असल्याचं मानलं जात आहे. 22 वर्षांच्या या तरुणीने संतापात हे कृत्य केल असल्याचं समोर येत असून या तरुणीने पोलिसांसमोर आपला गुन्हा देखील कबूल केल्याची माहिती आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, 15 वर्षांची असताना या तरुणीचा विवाह जबरदस्तीने तिच्या नवऱ्याशी करण्यात आला होता अशी माहिती आहे.
नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून अवयव शिजवले…
तपास करतांना पोलिसांना या तरुणीच्या पतीचा मृतदेह सापडला असून या महिलेने तिच्या नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून एका भांड्यात तिने हे अवयव शिजवले. जेव्हा याची दुर्गंधी आजूबाजूला पसरण्यास सुरुवात झाली. तेव्हा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी या प्रकाराची तक्रार पोलसांकडे केली.
पतीच्या अफेरमुळे पत्नीने काढला काटा…
इराण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची माहिती होती. तिने स्वताच्याच घरात या दोघांना रांगेहाथ पकडलेही होते.यामुळे पत्नी नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे प्रचंड त्रासलेली होती. पती दररोज तिला आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीला मारहाण करीत असे. तसेच तिच्या पतीचे इतरही अनेक महिलांशी संबंध असल्याचे तिला समजले दरम्यान त्यांच्यात भांडण झाले आणि भांडत असतांना तिचा पती तिच्या अंगावर चाकू घेऊन धावला होता.
पतीच्या हातातील चाकू हिसकावून तिने उलट पतीवर चाकूने हल्ला केला, पतीवर धारदार घाव झाल्याने पती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला होता. त्यानंतर तिने त्याच्या शरिराचे तुकडे केले आणि ते शिजवले. या तरुणीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र तरुणीला पोलिसांनी अटक केले असून तरुणी आता जेलमध्ये आहे.