जळगाव (प्रतिनिधी) धरणगावसह एरंडोल तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी पुर्णतः उध्वस्त झाल्याने दि. 3 नोव्हेंबर रोजी एरंडोल प्रांत अधिकारी श्री. गोसावी यांनी धरणगाव व एरंडोल तालुक्याची पाहणी करून अवकाळी पावसा मुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पाहिणी दरम्यान प्रांत अधिकारी श्री. गोसावी यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली व पावसा मुळे झालेल्या नुकसानी बाबत पांचनाम्या ची प्राक्रिया लवकरात लवाकर होऊन शेतकऱ्यांना भरपाई लवकर मिळावी अशी मागणी केली असता प्रांताधिकारी शेतकऱ्यांना म्हणाले की खचून जाऊ नका, प्रशासनस्तरावर सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वस्त केले.
पाहणीचे दौऱ्या प्रसंगी प्रांत अधिकारी श्री. गोसावी यांच्या सोबत धरणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार श्री.मोहोड , तालुका कृषी अधिकारी धरणगाव व एरंडोल श्री. माळी, मंडळ कृषी अधिकारी श्री. कणखरे व पाटील, कृषी पर्यवेक्षक श्री. साळुंखे यांच्या सोबत क्षेत्रीय महसुल मंडळ अधिकारी, कृषी सहायक व तलाठी उपस्थित होते.