मुंबई : सन २०१९ मध्ये शिक्षकभरती मध्ये २५२ अभियोग्यता उमेदवारांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातुन पुर्ण झाले असल्याकारणामुळे या शिक्षक उमेदवारांना सामावुन न घेता त्यांची पवित्र पोर्टल द्वारे करण्यात आलेली शिफारस मुजोर मुंबई महानगरपालिकेने अपात्र ठरवून, महाराष्ट्रातच मराठी युवक युतींवर सामाजिक अन्याय केला आहे
त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी काल दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी उशिरा रात्री ९ वाजता महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची नंदनवन या निवासस्थानी वंचित शिक्षक प्रतिनिधी श्रीमती श्वेता तेंडूलकर व श्रीमती आरती यांना सोबत घेऊन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापकअध्यक्ष अॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे, कार्याध्यक्ष ॲड.सुनिल प्रताप देवरे, महासचिव ॲड.प्रशांत वसंत जाधव, मुंबई जिल्हा अध्यक्ष सुहेल शेकासन मोहम्मद व अंधेरी तालुका अध्यक्ष असिरूल शेख यांनी मासुच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे @mieknathshinde
यांची मासूच्या शिष्टमंडळाने घेतली भेट !
आतातरी २५२ अभियोग्यता व पात्रता धारक मराठी शिक्षक उमेदवारांना न्याय मिळावा !@CMOMaharashtra@mybmcedu @mybmc@AshwiniBhide@AdvSunilDevare @AdvPrashantAsha @SuhailShekason @brizpatil @Alpesh400017 pic.twitter.com/bdnoAIgTa4— MAHARASHTRA STUDENTS UNION (@masuforjustice) August 18, 2022
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी प्रकारणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहल यांच्याशी रात्री ९ वाजता समक्ष दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या विषयाची गंभीरता त्यांच्या लक्षात आणून दिली तसेच यावर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश देखील दिले.