मुंबई : मुंबईला लागून असलेल्या रायगडमध्ये एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये शस्त्रे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये ही शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळली आहे.
ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल आणि शस्त्रास्त्रं आढळून आल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या रायगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने, आता यामागे काही घातपाताचा कट होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.
हे पण वाचा :
ग्राहकांसाठी पुन्हा खुशखबर! आज सोने-चांदीच्या दरात झाली ‘इतक्या’ रुपयांची घसरण
ATM: तुमची बँक मोफत मर्यादेपेक्षा किती शुल्क आकारते, लगेच जाणून घ्या
धक्कादायक ! झोपेत असलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं ओतलं उकळतं पाणी
यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायकच
अनोळखी बोट आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र कोणीही घाबरू नका. तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. बोटीमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेली नाही. त्यामधील वस्तू, साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. या बोटीबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाकडून तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) व एमएमबी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.