मुंबई : तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 51974 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी 56650 रुपयांना विकले जात आहे.
सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. एकदा सकाळी आणि दुसरी संध्याकाळी. आज सकाळी ibjarates.com वर जाहीर झालेल्या दरांनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51766 रुपये आहे, तर 916 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47608 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.
त्याचबरोबर 750 शुद्ध सोन्याचे भावही खाली आले आहेत. त्याची आज 38980 रुपयांना विक्री होत आहे. याशिवाय 585 शुद्धतेचे सोने 30404 रुपयांना उपलब्ध आहे. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीबद्दल बोलायचे झाले तर आज त्याची किंमत 56650 रुपये आहे.
हे पण वाचा :
ATM: तुमची बँक मोफत मर्यादेपेक्षा किती शुल्क आकारते, लगेच जाणून घ्या
धक्कादायक ! झोपेत असलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं ओतलं उकळतं पाणी
यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायकच
ना. महाजन यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांकडून अश्या चुकीची अपेक्षा नव्हती, नेमक काय घडले सभागृहात?
सोन्या-चांदीच्या किमती किती कमी झाल्या? –
सोने आणि चांदीचे दर दररोज बदलतात. 999आणि 995 शुद्धतेचे सोने 60 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 916 शुद्ध सोन्याच्या दरात 55 रुपयांनी घट झाली आहे. तर 750 शुद्धतेचे सोने 45 रुपयांनी आणि 585 शुद्धतेचे सोने 36 रुपयांनी स्वस्त होत आहे. याशिवाय 999 शुद्धतेची एक किलो चांदी आज 1171 रुपयांनी स्वस्त झाली आहे.