औरंगाबाद : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरात आलेल्या तरुणीचा एका युट्युब चॅनलच्या पत्रकाराने एका खून केल्याची घटना समोर आलीय. यानंतर खुनी पत्रकाराने औरंगाबाद ग्रामीणमधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात खुनाची कबूल दिली. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
अंकिता असे या तरुणीचे नाव असून ती जालना जिल्ह्यातली आहे. ती एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेली होती. मात्र, एका युट्युब चॅनलच्या पत्रकाराने या तरुणीचा खून केला. तसेच यानंतर खुनी पत्रकाराने पोलीस ठाण्यात जाऊन आणि पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुपवर याबाबक माहिती पाठवून खुनाची कबुली दिली आहे. आरोपी खुनी पत्रकाराने औरंगाबाद ग्रामीणमधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात खुनाची कबूल दिली.
हे पण वाचा :
जळगाव तालुक्यातील तरुणाच्या खुनाचा उलगडा ; पोलीस तपासात आले हे सत्य समोर
मोठी बातमी ! संरपचाची निवड आता जनतेतूनच, विधानसभेत विधेयक मंजूर
BECIL विविध पदांसाठी भरती, 75 हजार पगार मिळेल, लवकरच अर्ज करा
या दोघांची एंगेजमेंट झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, याबद्दल सविस्तर माहिती आलेली नाही. तर हा खून प्रेम प्रकरणातून झाला असावा, अशी शंका शेजारी आणि आजूबाजूला राहणारे नागरिक व्यक्त करत आहेत. खून झालेल्या तरुणीचा आणि आरोपी तरुणाचा सोबत असलेला फोटो या दोघांची चांगलीच जवळील असल्याचे सांगून जातो.