जळगाव: तालुक्यातील जुना कडगाव रोडवरील शेतात संदेश लिलाधर आढाळे या तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांचा तपास सुरु होता. तपासात आता या खुनाचा उलगडा झाला आहे. बहिणीची छेड काढल्याने खून केल्याची कबुली अल्पवयीन मुलांनी पोलिसांसमोर दिली आहे.या
जळगाव तालुक्यातील भादली ते जुना कडगाव रोडवरील पाटचारीला लागून असलेल्या शेतात संदेश आढाळे या तरुणाचा १० ऑगस्टला सकाळी ७ वाजता मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मयत संदेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नशीराबाद गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे पण वाचा :
उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने केली घाणेरडी मागणी, उर्फीने शेअर केली संपूर्ण चॅट
राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार? भाजप नेत्याच्या ट्विटने राज्याच्या राजकारणात खळबळ
गृह मंत्रालयातर्गत ‘या’ पदांची भरती ; पगार 122400 पर्यंत
घटना घडल्यापासून भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी प्रकरणात जातीने लक्ष घातले होते. संदेशचे मित्र कोण, त्याच्याशी कोणाचे वाद आहेत काय, यासह त्याला घटनेच्या दिवशी शेवटचा कॉल कोणाचा आला होता, याची संपूर्ण माहिती पोलिसांनी संकलित करण्यात आली होती. या माहितीच्या आधारावर दोन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचे निष्पन्न आले होते. त्यानुसार नशीराबाद पोलिसांनी सोमवारी दोघा मुलांना ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता, मयत संदेश हा बहिणीला त्रास देत होता. या कारणावरुन त्यास जीवे मारल्याची कबुली अल्पवयीन दोन्ही मुलांनी पोलिसांसमोर दिली. दोघांकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले.