ठाणे : राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच असून अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुंब्रा येथे एका तरुणीही हत्या करण्यात आली होती. मात्र याप्रकरणी पोलिसांनी आता मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीच्या प्रियकराने तिची हत्या केली आहे. ती गर्भवती होती, त्यामुळे आरोपी प्रियकराने हे धक्कादायक कृत्य केले.
नेमकी काय आहे घटना?
काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील निर्जन डोंगरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी पोलीस तपासात तरुणीचा गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. या आरोपी तरुणाला आपल्या गरोदर प्रेयसीपासून पिछा सोडवायचा होता. यामुळे त्याने आधी प्रेयसीचा गळा चिरून तिचा खून केला.
यानंतर त्याने मृतदेह डोंगरात लपवून ठेवला. आरोपी हा मृताचा मृत तरुणीचा प्रियकर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासात मृत तरुणी गरोदर असल्याचे समोर आले आहे. निर्जन टेकड्यांमध्ये तिचा मृतदेह सापडला होता, तसेच या मृतदेहाची ओळख पटली आहे. अल्तमश मुनोवर दळवी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. मृत तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते.
हे पण वाचा :
महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी
दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज सोने-चांदीच्या किमतीत झाली इतकी मोठी घसरण
मोठी दुर्घटना : ITBP च्या 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 6 जवान शहीद
जळगावसह या भागात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
तपास अधिकारी अशोक कडलक यांनी सांगितले की, मुलगी गरोदर राहिल्यानंतर अल्तमश मुनोवर दळवी याने तिच्यापासून सुटका करण्यासाठी निर्जन टेकडीजवळ चाकूने गळा चिरून तिची हत्या केली. यानंतर सुनसान डोंगरात आपल्या प्रेयसीचा मृतदेह लपवून पळ काढला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपीला अटक केली आहे.