मुंबई : राज्यातील काही भागात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. भारतीय हवमान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुणे, जळगाव यांसह विदर्भात पावसाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यासह जळगावात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय.
तसेच आज आणि उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.दरम्यान, मागील दोन दिवसारत राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. सध्या धरणांमधून नद्यांमध्ये विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भंडार जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळाली आहे. भंडारा जिल्हाची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहतेय. वैनगंगा नदी धोका पातळीपेक्षा 3 मीटर वाढ झाल्याने भंडारा शहराला पुराचा वेढा घातला आहे. जिल्हा प्राशसनाने खबरदारी म्हणून येथील लोकांनाविस्तापित केले आहे.
हे पण वाचा :
काय हौशी नवराय! एक-दोन नव्हे तब्बल 9 मुलींशी केले लग्न ; सांगितलं स्वतःचा अनुभव
अति भयंकर ! कोर्टातच पतीने चिरला पत्नीचा गळा ; कारण ऐकून सगळेच हादरले
या सरकारी कंपनीत बंपर भरती जाहीर, मंगळवारपासून अर्ज सुरू होणार, चांगला पगारही मिळेल
शिंदे गटातील आ. संतोष बांगरांनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात ; पहा हा Video
दरम्यान, अशातच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवमान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुणे, जळगाव यांसह विदर्भात पावसाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरूच असून आज जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.