बेंगळुरूः कर्नाटकमध्ये खळबळजनक घटना समोर आलीय. पतीने पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मयत महिलेचे नाव चैत्रा असून आरोपी पतीचे नाव शिवकुमार आहे. विशेष म्हणजे कोर्टातून बाहेर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना होलेनरसीपुरा येथील टाउन परिसरात ही घटना घडली आहे.
नेमकं काय आहे प्रकार?
चैत्रा आणि शिवकुमार यांचं लग्न सात वर्षांपूर्वी झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पती-पत्नी दोघेही समुपदेशन सत्रासाठी गेले होते.
समुपदेशन सत्रादरम्यान, पती-पत्नीने मतभेद विसरून एकत्र राहण्याचे आणि त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी देण्याचे मान्य केले होते. आपल्या मुलांसाठी आम्ही पुन्हा एकत्र राहू, असं न्यायाधीशांसमोर दोघांनीही मान्य केलं होतं. समुपदेशन सत्रानंतर दोघंही कोर्टातून बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर चैत्रा प्रसाधनगृहाकडे जात असताना शिवकुमारने पाठीमागून तिच्यावर हल्ला केला. पत्नीवर हल्ला केल्यानंतर त्याने मुलांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पत्नीवर हल्ला केल्यानंतर शिवकुमार घटनास्थळावरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, लोकांनी त्याला पडकले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चैत्राला होलेनरसीपुरा रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र गंभीर जखम व अधिक रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात नेत असतानाच चैत्राचा मृत्यू झाला.
हे पण वाचा :
या सरकारी कंपनीत बंपर भरती जाहीर, मंगळवारपासून अर्ज सुरू होणार, चांगला पगारही मिळेल
शिंदे गटातील आ. संतोष बांगरांनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात ; पहा हा Video
स्वातंत्र्यदिनी सोने स्वस्त झाले कि महाग? घ्या तपासून आजचे दर
शिवकुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे. आरोपी कोर्ट परिसरात धारदार शस्त्र घेऊन कसा आला, याचाही तपास करण्यात येत आहे. शिवकुमार विरोधात यापूर्वी घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात आले आणि त्यांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आले.