मुंबई : मागील काही सत्रात सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून येतेय. गेल्या दोनच दिवसात सोने तब्बल ८०० रुपयांनी वधारले आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमतीत बरीच वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव काल 47,750 रुपये होता, आज हाच भाव 10 ग्रॅमसाठी 48,150 रुपये आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा कालचा भाव हा 52,090 रुपये होता, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,530 रुपये मोजावे लागणार आहे. चांदी आज 59,300 रुपये आहे. काल हाच भाव 58,500 रुपये प्रति किलो रुपये होता.
हे पण वाचा :
धक्कादायक ! 20 वर्षीय तरुण विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तीन महिण्यापुर्वीच झाले होते लग्न
खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड
मलिक यांना झटका; समीर वानखेडेंना आणखी एका प्रकरणात क्लीन चीट
राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,150 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,530 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 585 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.