पाटणा : महाराष्ट्रानंतर बिहार राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. बिहारमध्ये आज जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे. जनता दल युनायटेडच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत. नितीश कुमार भाजप सोडतील, अशी अटकळ होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, जेडीयूकडून औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.
बिहारमध्ये सत्तेच्या नव्या समीकरणानुसार जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून सरकार स्थापन करतील. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार 160 आमदारांचे (आरजेडी-79, जेडीयू-45, काँग्रेस-19, डावे-16 आणि अपक्ष-1) समर्थनाचे पत्र घेऊन राजभवनात जाणार आहेत. तत्पूर्वी, महाआघाडीच्या सर्व पक्षांच्या आमदारांनी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना त्यांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. महाआघाडीच्या आमदारांचे आभार व्यक्त करताना तेजस्वी यादव म्हणाले की, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
हे पण वाचा :
शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न ; या 18 मंत्र्यांनी घेतली गोपनियतेची शपथ
भाजप नेत्याचा घाणेरड्या शब्दांत महिलेला शिविगाळ ; Video व्हायरल
Live : शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी ; पहा थेट प्रेक्षपण
आदित्य ठाकरेंचा जळगावसह नाशिक दौरा तात्पुरता रद्द; नेमकं कारण काय??