मुंबई : सध्या सोशल मीडियावर भाजप नेते श्रीकांत त्यागी यांचा महिलेला शिविगाळ करताना व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडीओनंतर आता श्रीकांत त्यागी अत्यंत घाणेरड्या शब्दांत महिलेसोबत शिव्या देत आहेत. याबाबत श्रीकांत त्यागी यांचा पोलीस शोध घेत असून यांच्या बायकोला ताब्यात घेतलं आहे. श्रीकांत त्यागी हे अटकेच्या भीतीने अज्ञातवासात गेले असून पोलिसांची (UP Police) पथकं त्यांच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहे.
श्रीकांत त्यागी यांनी आपला फोन स्वीच ऑफ ठेवलाय. तसंच ऑनलाईन पैसे पाठवणं, खर्च करणं, असे प्रकारही थांबवलेत. त्यामुळे त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत असून पोलिसांकडून काही पथकं त्यागी यांना शोधण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.
https://twitter.com/Potliwallebaba/status/1556139363746344962
काय प्रकरण?
श्रीकांत त्यागी हे स्वतःला राजकीय नेते असल्याचं सांगतात. ते भाजपशी संबंधित असल्याचंही सांगितलं जातं. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. 5 ऑगस्टला समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ते एका महिलेला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करताना दिसले. अवैध बांधकामावरुन जाब विचारणाऱ्या या महिलेशी अरेरावी करत बाचाबाची करणाऱ्या श्रीकांत त्यागी यांच्याविरोधात सोशल मीडियावरुन संतापाची लाट उसळली. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांच्या सोसायटीतील अवैध बांधकामावरही हातोडा टाकण्यात आला होता. हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या नोएडामधील सेक्टर 93 मध्ये असलेल्या ग्रॅन्ड ओमॅक्स सोसायटीत घडला.
Longer version of the video where BJP leader Shrikant Tyagi is seen abusing a woman.
Warning : **Abusive language** pic.twitter.com/1ahGdEjIUq— Mohammed Zubair (@zoo_bear) August 5, 2022
Action speaks louder in @myogiadityanath Govt.
Bulldozer demolishing encroached area of Shrikant Tyagi's flat in Noida's Omaxe Grand society.
Our MP @dr_maheshsharma ji & MLA @PankajSinghBJP ji not only stood with people of society but also ensured impartial action. pic.twitter.com/LulHxo9swA— Harsh Chaturvedi BJP (मोदी का परिवार) (@harshcha) August 8, 2022